Arthamimansa – Research Journal

विदर्भातील ग्रामीण पायाभूत सुविधा: केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा चिकित्सक आढावा

Arthamimansa
Research Journal
Publication Type Journal Article
Publication Year 2026
Author(s) श्रीकृष्ण बोढे , सुनिल शिंदे
Journal Name Arthamimansa Research Journal
Volume, Issue 18 , 1
Article Type Research Paper
Keywords: ग्रामीण पायाभूत सुविधा, विदर्भ, ग्रामीण विकास, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण विद्युतीकरण, सिंचन, शाश्वत विकास, प्रादेशिक विषमता

Abstract

प्रस्तुत संशोधनामध्ये विदर्भातील ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची परिणामकारकता चिकित्सक पद्धतीने अभ्यासण्यात आली आहे. ग्रामीण रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युतीकरण, सिंचन, स्वच्छता, गृह निर्माण आणि डिजिटल संपर्क या प्रमुख सुविधांच्या उपलब्धतेचे व परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून प्राथमिक व द्वितीयक माहितीचा वापर करण्यात आला आहे. अभ्यासातून असे स्पष्ट होते की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), मनरेगा आणि स्वच्छ भारत मिशन यांसारख्या योजनांमुळे विदर्भातील ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. तथापि, दुर्गम व आदिवासी भागांतील प्रादेशिक विषमता, अंमलबजावणीतील त्रुटी, गुणवत्तेच्या समस्या आणि अपुरी देखभाल यांमुळे योजनांची परिणामकारकता सर्वत्र समान प्रमाणात दिसून येत नाही.